Delhi Metro News | दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Delhi Metro News | दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 18, 2026 | 2:08 PM

दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात आज भीषण आग लागली, ज्यामुळे 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. आग लगेच पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी 30 गाड्या पाठवून आग विझवण्याचे काम सुरु केले आहे.

दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात आज भीषण आग लागली, ज्यामुळे 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. आग लगेच पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी 30 गाड्या पाठवून आग विझवण्याचे काम सुरु केले आहे. तसेच, जे लोक इमारतीमध्ये अडकले आहेत त्यांना भिंत तोडून बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही, नागरिकांना परिसरात जाऊ नका, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. ही घटना दिल्लीकरांसाठी मोठा धक्कादायक ठरली आहे.

Published on: Mar 18, 2026 02:08 PM
Follow Us