Malegaon Blast : आरोपींवरचे बहुतांश आरोप खोटे.. ; आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यापूर्वी कोर्टाने नेमकं काय म्हंटलं?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची मागणी केली होती, पण न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोप फेटाळले. कोर्टाने आरडीएक्सचा पुरावा आणि मोबाईल डेटाचा अभाव, तसेच साध्वीची बाईक स्फोट स्थळी असल्याचा पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे.सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. दरम्यान, कोर्टाने नेमकं काय म्हंटलं ते जाणून घेऊ..
बॉम्बब्लास्टसाठी वापरलेले आरडीएक्स ही प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा कोणताही पुरावा नाही असं कोर्टाने नमूद केलं. तर मोबाईलमधून देखील कोणतेही पुरावे आढळून आले नाही. युएपीए लावणं योग्य नव्हतं. ब्लास्टच्या वेळी वापरलेली बाईक ही साध्वीची होती हे सिद्ध होत नसल्याचंही कोर्टाने म्हंटलं. ब्लास्ट बाईकवर झाला ही सिद्ध झालं नाही. दरम्यान, पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही, असंही कोर्टाने म्हंटलं. आरोपींच्या विरोधातले बहुतांश आरोप चुकीचे आहे आणि त्याच आधारावर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

