Malegaon Rain | मालेगावात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी

मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तर सखल भागात पाणी साचले होते. (Malegaon Heavy Rain waterlogging in city)

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मालेगावात जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तर सखल भागात पाणी साचले होते. शहरातील वार्ड नं 20 सर सय्यद नगर भागात कमरेपर्यंत पाणी साचून अनेक घरात पावसाचे पाणी शिरले. यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास झाला तर घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनासह बळीराज्याला काहीसा दिलासा मिळाला.  (Malegaon Heavy Rain waterlogging in city)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI