Video : नवनीत राणा यांची विचारपूस करण्यासाठी मंगल प्रभात लोढा लिलावती रुग्णालयात
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याचं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिलं. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला 12 दिवस जेलवारी करावी लागली. अखेर जामिनावर […]
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा लावण्याचं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिलं. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला 12 दिवस जेलवारी करावी लागली. अखेर जामिनावर सुटका झाल्यानंतर हे दोघेही बाहेर आले. मात्र, नवनीत राणा यांना मानेच्या त्रासामुळे थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते मंगल प्रभात लोढा लिलावती रूग्णालयात पोहोचले. त्यांनी नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

