मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानानंतर मंगेश कुडाळकर यांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, आम्ही स्वीकारतो पण…
मंगेश कुडाळकर यांचं चॅलेंज, आदित्य ठाकरे कोणती भूमिका घेणार? चॅलेंज स्वीकारणार की प्रत्युत्तर देणार?
मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यापेक्षा वरळी मतदारसंघात चांगलं काम करून दाखवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले वरळीतील चॅलेंज आम्ही स्वीकारतो पण कुर्ल्यात येऊन त्यांनी माझ्या विधानसभेत निवडणूक लढवून दाखवावं’, असे म्हणत मंगेश कुडाळकर यांनी ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांना दिले आहे. मंगेश कुडाळकर यांच्या चॅलेंजनंतर आदित्य ठाकरे कोणती भूमिका घेतात की त्यांना प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

