परळीवाल्याला तर आता… मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.. काय घडलं?

परळीवाल्याला तर आता… मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.. काय घडलं?

| Updated on: May 31, 2026 | 11:39 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर नेत्यांशी उशिरा रात्रीपर्यंत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रात्र १ वाजताच्या सुमारास आपले आमरण उपोषण मागे घेतले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर नेत्यांशी उशिरा रात्रीपर्यंत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रात्र १ वाजताच्या सुमारास आपले आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणादरम्यान तीव्र उष्णता आणि रखरखत्या उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील ४८ तास विशेष निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर एक वेगळीच मागणी केली. त्यांनी स्वतःची तसेच आणखी एकाची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. या मागणीबाबत त्यांना आज प्रश्न विचारताच त्यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, “परळीवाल्याला आता पुन्हा धरारावर धरणार आहे. धनंजय मुंडेची नार्को टेस्ट करा. ही टेस्ट केली की सगळंच उघड होईल. आंधळे प्रकरणात काय झालं, संतोष देखमुकांचं काय झालं, सगळं कळेल.”

हे प्रकरण काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालीन अशी धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड समर्थकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, याच्याशी संबंधित आहे. आधीही याच विषयावर जरांगे यांनी धनंजय मुंडेवर सुचक निशाणा साधला आहे.

Published on: May 31, 2026 11:38 AM
Follow Us