… ही दादागिरी, किती दिवस अन्याय सहन करणार? मनोज जरांगे पाटील भडकले
नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही सर्व समाजाचे सर्व समावेशक नेते समजायचं कसं असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही जर तुम्ही म्हणताय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तर ही दादागिरी झाली, असेही त्यांनी म्हटले
छत्रपती संभाजीनगर, ११ जानेवारी २०२४ : मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय. नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही सर्व समाजाचे सर्व समावेशक नेते समजायचं कसं असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही जर तुम्ही म्हणताय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तर ही दादागिरी झाली, असे म्हणत आम्ही मराठा समाज कुणबी समाजातून आरक्षण घेऊच, किती दिवस अन्याय सहन करणार? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा निर्धार व्यक्त केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, अहवालाबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. तर मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाला सरसकट टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्ही मराठा आरक्षण कधीच नाकारलं नाही ते टिकणारं आरक्षण हवंय इतकीच आमची मागणी आहे. ते नाही तर २० जानेवारीला आम्ही मुंबईत धडकणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
