एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं… मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?

एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं… मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Oct 20, 2026 | 3:02 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी दिल्ली आणि राज्यातील भाजप नेत्यांना आपण जरांगेंना ५०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. जरांगेंनी हे आरोप फेटाळत, उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी दिल्ली आणि राज्यातील भाजप नेत्यांना आपण जरांगेंना ५०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले असून, आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांना थेट आव्हान दिले. त्यांनी प्रश्न केला, “तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले असे भाजपला का सांगितले? आणि जर दिले नसतील तर भाजप नेमका तुम्हालाच संपवत आहे का?” भाजपच्या अंतर्गत वर्तुळात ५०० कोटी रुपये श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मला मिळाल्याची कुजबुज सुरु असल्याचा दावाही जरांगेंनी केला.

आपल्याला आपल्या आयुष्यात ५००० रुपयेही व्यवस्थित पाहिली नसल्याचे ते म्हणाले. या सर्व आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. हे खोटे असल्यास शिंदे यांनी ते जाहीर करावे, अन्यथा आपण गप्प बसणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.

Published on: Oct 20, 2026 3:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us