Jarange vs Rane Video : 'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे अन् जरांगे पाटलांमध्ये जुंपली

Jarange vs Rane Video : ‘राणेंनी बोलू नये’, मराठा आरक्षणावरून नारायण राणे अन् जरांगे पाटलांमध्ये जुंपली

| Updated on: Jan 20, 2025 | 10:34 AM

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठ्यांना कुणबी आरक्षण नको, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. यानंतर नारायण राणे यांना मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे हे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. मराठ्यांना कुणबी आरक्षण नको, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर नारायण राणे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय. एवढंच नाहीतर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांना एक आव्हान दिलंय. सरकारने मराठा समाजाला दिलेले कोणतीच आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. ते प्रश्न नारायण राणे यांनी सोडवावे, असं जरांगे पाटील म्हणालेत. या आव्हानानंतर नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंकडून शिकावं, त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांनी केलेल्या भाष्यानंतर अंबादास दानवे यांनी त्यांना धारेवर धरलंय. ज्या मराठ्यांना कुणबी व्हायचंय त्यांना नारायण राणे कसं थांबावणार? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, २५ जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 20, 2025 10:34 AM