500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले…

500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले…

| Updated on: Oct 25, 2026 | 4:16 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले. एक ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणातील काही शक्ती आपल्यावर आणि समाजावर अन्याय करत असून, ते सत्य दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला. ही क्लिप खोटी ठरू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या ऑडिओ क्लिपवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप अचानक का थांबले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचे प्रयत्न पडद्यामागे सुरू असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला. ते म्हणाले की, “काही लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना समाजात नको आहेत.

सत्य सांगणारे लोक त्यांना नको आहेत, कारण यामुळे त्यांची प्रतिमा मलीन होते.” ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्यासाठी पडद्यामागे काही राजकारण्यांचे डावपेच सुरू असून, या प्रयत्नांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब यात नसतील, तर हे सत्य बाहेर येईल. जर त्यांनी यात काही काळबेर केले, तर त्यांची प्रतिमा मलीन होईल, असेही ते म्हणाले. जरांगे पाटलांनी या क्लिपचे सत्य समोर आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

Published on: Oct 25, 2026 4:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us