मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून…
दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.
बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा होणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. तर मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार आणि मी एक भक्त म्हणून नारायण गडावर जाणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ‘मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान मराठा समाज येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ 12 वाजेची वेळ ठरलेली आहे. येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झालं. तरी 2 वाजेपर्यंत गडावरच राहायचं आहे.’, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. अतंरवाली सराटी येथील नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published on: Sep 30, 2024 12:42 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
