Manoj Jarange Patil : आम्हाला मलमपट्टी नको तर… मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काय दिला थेट इशारा?
VIDEO | आज जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. तर मराठा समाजाला संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आम्हाला मलमपट्टी नको तर कायमचा उपचार हवा
जालना, २२ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचे शेवटचे दोन दिवस उरले आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यातील अतंरवाली सराटी गावात मराठा बांधवांची एक बैठक झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित करत आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे सांगितले तर राज्य सरकारला विनंती करत पुन्हा एकदा इशारा दिलाय. जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्हाला आता कोणतेही बहाणे नको. आता कोणतीही मलमपट्टी नको तर कायमचा उपचार हवा तो म्हणजे मराठा आरक्षण. सरकारच्या हातात अजून दोन दिवस आहेत. आज शेवटची विनंती. मराठ्यांच्या नादी लागू नका’, असे म्हणत त्यांनी इशारा दिला. मराठा समाज तुमच्याकडे काहीच मागत नाही, पण मराठ्याच्या मुला-बाळांसाठी आम्हाला आरक्षण हवंय, असेही जरांगे पाटील म्हणाले.
Latest Videos
Latest News