AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घामटा फुटणार?

24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर आम्ही दोन टप्प्यात आंदोलन करू. 25 तारखेला आमरण उपोषण करू. ते झेपणार नाही. त्यानंतर 28 तारखेनंतर दुसरं आंदोलन करू. ते आंदोलन मात्र सरकारला पेलणारन नाही. हे शांततेचं युद्ध असेल. ते देश पाहिल.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घामटा फुटणार?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2023 | 3:29 PM
Share

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 22 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारविरोधातील आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच 25 ऑक्टोबरपासून गावागावातील मराठा समाज सर्कलवर येऊन साखळी उपोषण करणार आहे. अख्खं गावचं उपोषणाला बसणार आहे, असं सांगतानाच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही वैधानिक पदावर असलेल्या राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन उपोषणाची घोषणा केली. राज्य सरकारने जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी समाजाला न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. मराठा समाजाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं. नाही तर आमच्या गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

गावागावात साखळी उपोषण

25 तारखेपासून सर्व गावातून प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही ताकदीने साखळी उपोषण करू. त्यानंतर 28 तारखेपासून त्याचं रुपांतर आमरण उपोषणात होईल. सर्कल निहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी सर्कलच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून उपोषण करायचं आहे, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

कँडल मार्च काढा

प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं आंदोलन असेल. आंदोलन सुरू झाल्यावर ते सरकारला झेपणार नाही. त्यानंतर 25 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा सांगणार आहोत. ती पेलणार नाही. उपोषण सुरू झाल्यावर सांगू. दोन टप्प्यात आंदोलन करू. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

आंदोलन झेपणार नाही

आमरण उपोषण आणि सर्कलचे साखळी उपोषण ताकदीने सुरू होणार आहे. चार दिवसात तुम्हाला आमचं आंदोलन झेपणार नाही. पण 25 तारखेला 28 तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. जी दिशा सांगितली जाईल ती सरकारला पेलणार नाही. तुमच्यासाठी सोप्पं असेल. पण आंदोलन सुरू झाल्यावर झेपणार नाही. हे शांततेचं युद्ध असेल. ते तुम्हाला झेपणार नाही. ते तुम्हाला पेलणार नाही. त्याची दखल घ्या. 24तारखेच्या आत आरक्षण द्या, असं ते म्हणाले.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...