Manoj Jarange Video : ‘त्या’ नासक्या मंत्र्यांचं नाव… धसांना खूप जीव लावला पण… जरांगेंचा रोख कोणावर? नेमकं काय म्हणाले?
सुरेश धस यांना आम्ही खूप जीव लावला होता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर सवाल केला असता मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.
सुरेश धस यांना आम्ही खूप जीव लावला होता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर सवाल केला असता मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. आज शिवजंयती सारखा चांगला दिवस असून त्यामुळे क्रूर आणि नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागलंय. धाराशिव मधील कळंब याठिकाणी भगवा ध्वज फडकावत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवजयंती सोहळ्याची सुरुवात करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केल्याचे पाहायला मिळाले तर राहुल सोलापूरकर देखील मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारच्या आशीर्वादानेच कारवाई करण्यात आली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी टीका करत सरकारवर घणाघात केला.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

