‘फडणवीस स्वतःची जमीन, बंगला विकून पैसे देत नाही तर..’, ‘लाडकी बहीण’वरून जरांगे पाटलांनी डिवचलं
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभरातील विविध भागात दौरा करत आहेत. बीड जिल्ह्यातील तांदळा गावाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडल्याचे पाहायला मिळाले.
राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सरकारकडून महिलांना अटी शर्तींच्या पूर्तता करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने वरह मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. इतकंच नाहीतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. चांगली योजना आहे. तुम्ही पण सगळ्यांनी फॉर्म भरा. कारण ते आपलेच पैसे आहेत. देवेंद्र फडणवीस काय त्यांची जमीन आणि नागपूरचा बंगला विकून पैसे देत नाहीत. पण तुम्ही लाडकी बहिणीला पैसे दिले पण लाडक्या भाच्याचं काय? त्यांच्या आरक्षणाचं काय?, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Published on: Aug 28, 2024 02:05 PM
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
