Manoj Jarange Patil : ‘त्या’ व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत
Manoj Jarange Patil Interview : कैलास बोराडे याचा एक व्हिडिओ आज सकाळी मनोज जरांगे यांनी दाखवला होता. त्यानंतर त्यावर कैलास बोराडे यांनी खुलासा दिला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदू धर्माला कलंक लावणारा हा इसम आहे. मी सकाळी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवला तेव्हा देखील मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. आत्ताही मी कोणाचं नाव घेत नाही. मात्र हा व्हिडिओ दाखवल्यानंतर हा इसम कोण आहे हे पोलिसांनी शोधावं असं मी म्हंटलं होतं. हे व्हिडिओ हिंदू देवतांची विटंबना करणारे आहेत. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. या घटनेला जातीचा रंग द्यायची गरज नाही. त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्यातील कैलास बोराडे या व्यक्तीला चटके दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. कैलास बोराडे या व्यक्तीचा देव-देवतांसोबतचा एक व्हिडिओ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांना दाखवला आहे. त्यानंतर स्वत: कैलास बोराडे याने यावर बोलताना आपल्या अंगात देव येतो म्हणून आपण असं वागतो आणि आपण पिलेली दारू ही प्रसाद होती, असा खुलासा त्याने केला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना या खुलाशावर संताप व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. यामुळे काहींच्या हातात आयतं कोलीत जातं. जसं छगन भुजबळ यांच्या हातात गेलं आहे. जातीय विष पेरून ते भाजप आणि फडणवीस यांच्या सरकारला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डाग लावत आहेत. मागचा पुढचा विचार न करता कोणाचेही फोटो कोणालाही चिटकवून दाखवतात. एवढा उतावळेपणा नको. भाजपचा नारा आहे, एक है तो सेफ है, मग अशा प्रकारच्या हिंदू देवतांच्या विटंबनेवर फडणवीस सरकार काय भूमिका घेणार? असा संतप्त प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
