Manoj Jarange Patil Video : ‘धनंजय मुंडेंनी करूणा शर्मांना घरी न्यावं अन्….’, जरांगे कोर्टाच्या निर्णयावर काय म्हणाले?
वांद्रेतील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना १,२५,००० आणि मुलगी शिवानी मुंडे यांना ७५,००० ची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला. धनंजय मुंडेवर करुणा शर्मानी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आले.
मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेविरोधात मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयात करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडेंना दिले आहेत. वांद्रेतील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना १,२५,००० आणि मुलगी शिवानी मुंडे यांना ७५,००० ची पोटगी देण्याचा अंतरिम निकाल दिला. धनंजय मुंडेवर करुणा शर्मानी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आले. दरम्यान, कोर्टाने करूणा शर्मा यांना दिलासा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मंत्री धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना घरी न्यावं आणि वाद मिटवावा’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते पुढे असेही म्हणाले, करूणा मुंडेंचा वनवास संपवला पाहिजे असं म्हणत करूणा शर्मा यांना न्याय द्या नाहीतर कर्माची फळं वाईटपणे भोगावे लागतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केली. तर तुमच्या कौटुंबिक वादात आम्हाला पडायचं नाही तुम्ही तिला न्याय द्या, वाद मिटवा आणि घरी घेऊन जा असा सल्लाही मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना यावेळी दिला.