“…अन्यथा मी पाणउतारा करेन”, नारायण राणे यांना जरांगे पाटलांची शेवटची विनंती
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. जरांगेंनी बेताल बडबड करू नये आता त्याने मर्यादा ओलांडली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावर जरांगे पाटलांनी पलटवार केलाय.
जालना, १६ फेब्रुवारी २०२४ : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ‘ मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. जरांगेंनी बेताल बडबड करू नये आता त्याने मर्यादा ओलांडली आहे.’, असे राणे म्हणाले होते. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय. ‘मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. मी माझ्या मर्यादा पळतोय म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन’, असे मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना उद्देशून म्हटले.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

