‘डुप्लिकेट… येवल्याचा नेता आता कुठे गेला?’, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला आहे? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
महाराष्ट्र सरकारकडून 15 जातींना ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात यावं, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलं आली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली त्या 15 जातींमध्ये बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयार, पवार, कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, रुकेकरी, लोध लोधा लोधी, डांगरी यांचा समावेश आहे. पण या जातींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. येवल्याचा नेता आता कुठे गेला? मनोज जरांगे पाटील यांनी असा सवाल करत छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना केला. तर सरकारकडून मराठ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. बघा काय म्हणाले जरांगे पाटील?