AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या सभेपूर्वीच राजकारणात गरमागरमी, कुणी केली अटकेची मागणी?

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या सभेपूर्वीच राजकारणात गरमागरमी, कुणी केली अटकेची मागणी?

| Updated on: Oct 14, 2023 | 10:43 AM
Share

tv9 marathi Special Report | मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी 17 दिवस उपोषण आणि त्यानंतर मराठवाड्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यांचा दौरा करणाऱ्या जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत जाहीर सभा होतेय. या सभेपूर्वी राजकारण चांगलंच रंगलंय

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसाठी 17 दिवस उपोषण आणि त्यानंतर मराठवाड्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यांचा दौरा करणाऱ्या जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत जाहीर सभा होतेय. तब्बल 100 एकर जागेवर होणाऱ्या सभेला राज्यभरातून मराठा समाजबांधव येणार असल्याचं खुद्द जरांगे यांनी म्हटलंय. राज्यात उकाडा वाढलाय, त्यामुळे सभेला येताना काळजी घेण्याचं आवाहनही जरांगे यांनी केलंय. जरांगे पाटील यांच्या सभेवरुन राजकारणही चांगलंच तापलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. भुजबळ यांची समता परिषदेच्या एका कार्यक्रमातील ऑडिओ क्लिपही समोर आलीय. त्यावरुन जरांगे पाटलांनी भुजबळांवर चिल्लर माणूस म्हणून निशाणा साधला. यावरून वाद-विवाद सुरू असताना मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत जाहीर सभा होतेय. मात्र, या सभेपूर्वी राजकारण चांगलंच रंगलंय. गुणरत्न सदावर्तेंनी तर जरांगेंच्या अटकेचीच मागणी केलीय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 14, 2023 10:42 AM