Maratha Tourist Train : किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेतून प्रवाशांना त्यांच्या आयुष्याशी निगडित जन्मस्थळ, निवासस्थान, राज्याभिषेक तसेच विजयी मोहिमांशी संबंधित किल्ल्यांवर प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार आहे. या अनोख्या प्रवासात पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे.
राज्यातील पर्यटनप्रेमी आणि भटकंतीची विशेष आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई आणि पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचे दर्शन आता घेता येणार आहे. इतकंच नाहीतर मराठा पर्यटन ट्रेनमधून प्रवास करताना पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज देखील देण्यात येणार आहे.
6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
‘आयआरसीटीसी’द्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा लाभ देशभरातील रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. 6 दिवसांच्या प्रवासात विशेष पर्यटन मार्गात रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळगडाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार आहे. यामध्ये किल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड या स्थळांचा समावेश आहे.

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?

बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन

अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA

अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
