India Pakistan War : भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, पाहून तुम्ही म्हणाल…
भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची तळपायाची आग मस्तकात गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पाकिस्तानमध्ये युद्धाची खुमखुमी तशीच असल्याचे दिसतेय. तर भारताने देखील पाकला प्रत्युत्तर दिलंय.
भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आल्याचा एक सॅटेलाईट फोटो समोर आला आहे. पाकिस्तानच्या भोलारी, नूर खान, जेकोबाबाद आणि सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, भारताकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तराचे सध्या फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या चार एअरबेसच्या नुकसानाचे फोटो सध्या समोर आले आहेत. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईंतर्गत पाकिस्तानच्या तोंडचं चांगलंच पाणी पळालं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. याच हल्ल्यांना दोन दिवसापूर्वी भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी भारताने पाकचा डाव उधळून लावत पाकच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसवर स्फोट घडवून आणत ते पूर्णतः उद्ध्वस्त केले होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहेत.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित

