Vaishnavi Hagawane Case : मयूरी जगताप प्रकरणात महिला आयोगाने ग्रामीण पोलिसांवर ठपका ठेवला
Vaishnavi Hagawane Case Update : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मयूरी जगतापच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
मयूरी जगताप कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाने पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका ठेवलेला आहे. मयूरीच्या प्रकरणात चार्जशीट 60 दिवसांत दाखल झाली नाही. चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे. यासंदर्भातलं पत्र रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मयूरी ही हगवणे कुटुंबाची मोठी सून आहे. वैष्णवी प्रमाणेच हगवणे कुटुंबाने तिचा देखील छळ केला होता.
दरम्यान, मयुरी जगताप हिने 6 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यातील पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण हगवणे कुटंबीयांच्या विरोधात तक्रार करत आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं. तसंच संबंधितांवर कारवाई करावी, असं या पत्रात म्हणण्यात आलं होतं.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

