AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पाटलांचं आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान, मुंबईचं लक्ष निवडणुकीकडे!

शेलार-पवार गटातर्फे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत आता आशिष शेलार-संदीप पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे.

'या' पाटलांचं आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान, मुंबईचं लक्ष निवडणुकीकडे!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 11, 2022 | 8:46 AM
Share

दिनेश दुखंडे, मुंबईः मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Asociation) निवडणुकीत मोठी उलथापालथ झालेली पहायला मिळतेय. काल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर आज आणखी एक घडमोड समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी या राजकीय गटाला आव्हान देण्याचं ठरवलं आहे. संदीप पाटील यांनी यापूर्वी शरद पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला होता. मात्र काल पवार-शेलार युती झाल्यानंतर या राजकीय युतीला क्रिकेटपटूंनी आव्हान द्यायचं ठरवलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शेलार-पवार युती झाली आहे. त्यामुळे संदीप पाटील यांनी आपण स्वतंत्र गटातर्फे निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

MCA च्या राजकारणात पहिल्यांदाच झालेल्या शरद पवार-आशीष शेलार यांच्यात युती झाली. त्यानंतर काल माटुंग्यात संदीप पाटील यांनी स्वतंत्र गटाची घोषणा केली.

मुंबई क्रिकेट ग्रुप असं या गटाचं नाव असून त्याच्या बोध चिन्हाचीही घोषणा केली.

याआधी घोषित झालेले शरद पवार गटातील उमेदवार, ज्यांना नव्या पवार-शेलार गटात स्थान मिळू शकले नाही, ते सर्व संदीप पाटील यांच्या मुंबई क्रिकेट गटात असतील.

शेलार-पवार गटातर्फे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत आता आशिष शेलार-संदीप पाटील यांची अध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी न्यायालयाने वयाची अट घातल्याने शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात थेट उतरू शकले नाहीत. त्यामुळे शेलार यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरलाय. तर शेलार-पवार पॅनलतर्फे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स कौंसिलसाठी स्वतंत्र अर्ज भरला. तर विहंग सरनाईक यांनी एमपीएल म्हणजेच मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्षपदाची निवडणूक अमोल काळे हे लढवत आहेत. अशा रितीने विविध पक्षांचे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलद्वारे निवडणूक लढवताना दिसतील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?