आनंदाची बातमी? त्वरा करा, मुंबई म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघणार; या तारखेला होणार सोडत
गेल्या वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू आहे. मात्र, अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता मंडळाने 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली.
मुंबई : मुंबईत राहणं आणि आपलं एखादं घरं असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. आणि ते म्हाडामुळे अनेकाचं स्वप्न पुर्नत्वास गेलं देखिल आहे. आता तुमचेही हे स्वप्न पुर्ण होऊ शकेल. त्यासाठी मग घाई करा. गेल्या वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू आहे. मात्र, अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता मंडळाने 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून याच दिवसापासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तर त्याचा शेवटचा दिवस हा 26 जून असेल. तर 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाची शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

