Jitendra Awhad | मुंबईत म्हाडाची 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी निघणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

पहाडी गोरेगाव इथल्या घरांसाठी ही लॉटरी असेल, त्या इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झालं आहे. यात दुर्बल घटकांसाठी 1947 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न 227, उच्च उत्पन्न गट 105, वन रुम किचन 25 लाखाच्या आत असेच प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार आहे.

मुंबई : मुंबईत म्हाडाच्या 3015 घरांसाठी निघणार लॉटरी निघणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. पहाडी गोरेगाव इथल्या घरांसाठी ही लॉटरी असेल, त्या इमारतींचे काम ७० टक्के पूर्ण झालं आहे. यात दुर्बल घटकांसाठी 1947 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न 227, उच्च उत्पन्न गट 105, वन रुम किचन 25 लाखाच्या आत असेच प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार आहे. पुण्यालाही 100 एकर जागा घेतली आहे. ठाण्यात घरे बांधतो आहे. सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल. म्हाडाच्या घरांचा दर खाजगी बिल्डरांपेक्षा 60 टक्के दर कमी आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI