AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 11:06 PM
Share

सरकारमधील मंत्र्यांना अटक होत असून यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी राजवट लागू होणार असा सूचक इशाराही दिला आहे.

मंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांनाही मंत्री असतानाच ईडीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे हे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे भाजपचे नेते सांगत आहे. सरकारमधील मंत्र्यांना अटक होत असून यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी राजवट लागू होणार असा सूचक इशाराही दिला आहे. सरकारचे मंत्री जेलमध्ये जात असल्याने व 22 वेळा सरकारकडून पायमल्ली करुनही सरकार का पडणार नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास, सरकार घटनात्मक तरतुदींनुसार चालणार नसल्यास, राज्यानं केंद्राचे महत्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास आणि सरकारनं बहुमत गमावल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असते. मात्र अशी परिस्थिती राज्यात दिसत नसून ठाकरे सरकारची बाजू भक्कम असल्याचे सांगितले जात आहे.