Chhagan Bhujbal यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले, टोल बंद होणार नाही…
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे राज्यातील टोल दरवाढीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. टोल अजिबात बंद होणार नाहीत, नितीन गडकरी यांनी ठणकावून सांगितलं
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकीकडे राज्यातील टोल दरवाढीवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. टोल अजिबात बंद होणार नाहीत, नितीन गडकरी यांनी ठणकावून सांगितलं, तर मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद झाले नाहीत, असे छगन भुजबळ म्हणाले. तर टोल शिवाय रस्ते होणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. 1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी झालेल्या टोल दरवाढी विरोधात मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलच्या वाढीव दरवाढीविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावर राज ठाकरे यांनी आज भाष्य करत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....

