Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde Video : अंजली दमानियांना 'बदनामिया' म्हणत 'त्या' गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे भडकले अन्...

Dhananjay Munde Video : अंजली दमानियांना ‘बदनामिया’ म्हणत ‘त्या’ गंभीर आरोपांवर धनंजय मुंडे भडकले अन्…

| Updated on: Feb 04, 2025 | 3:46 PM

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड करत मोठा गौप्यस्फोट केला. इतकंच नाहीतर पुराव्यानिशी आरोप करत अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानियांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण देत अंजली दमानिया यांचा उल्लेख ‘बदनामिया’ असा केला आहे. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. “जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवली गेली. त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते. त्यात जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे म्हणून निविदा प्रक्रियेला दोनदा मुदत वाढ दिली. कोणी दोन वेळा मुदत वाढ देईल का?” असा सवालही धनंजय मुंडेंनी केला.

Published on: Feb 04, 2025 03:39 PM