किराणा दुकानात दारू ठेवल्यास लोकांचे हाल होणार : Ramdas Athawale

किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल… अशा काव्यमय शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी ठाकरे सरकारच्या वाइन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाइन (Wine) विक्रीला परवानगी दिली आहे.

प्रदीप गरड

|

Jan 29, 2022 | 4:45 PM

किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल… अशा काव्यमय शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी ठाकरे सरकारच्या वाइन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाइन (Wine) विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात राजकीय झिंगाट सुरू झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने (bjp) कडाडून विरोध केला आहे. तर आघाडीने या निर्णयाचं समर्थन केलं आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र करायचं आहे का?, असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. तर, वाइन विक्रीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर भाजपची सत्ता असलेल्या मध्यप्रदेशात तर घरपोच वाइन पोहोचवण्याचं धोरण असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी भाजपची कोंडी केली आहे. त्यात आता आठवलेंनी उडी घेऊन या निर्णया विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें