Jaykumar Gore यांच्यावर 9 जूनपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश-tv9

मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीचा करार केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी अटकेपासून जरी संरक्षण मिळाले असले तरी मात्र जयकुमार गोरे यांना फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 18, 2022 | 9:40 PM

सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. कारण जयकुमार गोरेंविरोधात साताऱ्यात एका जमीन प्रकरणात गुन्हा (Satara Police) दाखल झाला आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यानंतर जयकुमार गोरे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांना आता काहीसा दिलासा मिळा आहे. कारण आमदार जयकुमार गोरे यांना 9 जूनपर्यंत कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी त्यांची अटक टळली आहे. हे आदेश मुंबई उच्च न्यायलयाने (Bombay High Court) काढले आहेत. मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीचा करार केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी अटकेपासून जरी संरक्षण मिळाले असले तरी मात्र जयकुमार गोरे यांना फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें