AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना MLA Ravi Rana यांचा चेतावणीखोर सल्ला

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 9:06 PM
Share

एक अधिकारी ऐकत नव्हता म्हणून महिलांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यामुळे अधिकारी ऐकत नसेल तर त्याला जोड्याने मारा असा चेतावणीखोर सल्लाच आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे मागील काही दिवसांपासून कायम चर्चेत आहे. आणि त्याचे कारण म्हणजे आमदार रवी राणांच्या महिला कार्यकर्त्यांनी अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त डॉ प्रविण आष्टीकर यांच्यावर केलेल्या शाईफेकीमुळे अलीकडेच आ. रवी राणा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे रवी राणा हे चर्चेत आले होते. या प्रकरणी रवी राणा यांना न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला असतानाच आता आमदार रवी राणा यांनी एक चेतावणीखोर वक्तव्य केलं आहे. एक अधिकारी ऐकत नव्हता म्हणून महिलांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली. त्यामुळे अधिकारी ऐकत नसेल तर त्याला जोड्याने मारा असा चेतावणीखोर सल्लाच आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे.