आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा भडकले, म्हणाले ‘माझा विजय अजूनही पचत नाही…’
पुण्याच्या पाणी प्रश्नावरून मला बैठकीसाठी वेगळी वेळ दिली आणि बैठक आधी घेतली. हा प्रकार काही पहिल्याचा घडला नाही. याआधीही पालकमंत्री असेच वागले होते. मी ही निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.
पुणे : 2 सप्टेंबर 2023 | पुणे शहराचा पाणीप्रश्न पेटला आहे. पाणीप्रश्नावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी कसबापेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांना चुकीची वेळ दिल्याने ते या बैठकीला उशिरा पोहोचले. ते बैठकीला गेले तेव्हा बैठक संपली होती. यावरून आमदार धंगेकर भलतेच संतापले. पाऊस पडत नाही आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये अशी मिटिंग जर आटपत असेल तर हे चुकीच आहे. ते ज्या पद्धतीने हे कामकाज करतात हे काय मला बरं वाटत नाही. दिवंगत आमदार मुक्ताताई यांच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत मी निवडून आलो आहे. त्यामुळे माझा विजय अजून त्यांना पचलेला नाही अशी टीका रविंद्र धंगेकर यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर केली.

