AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'शिवनेरी सुंदरी'वरून रोहित पवार भडकले; एसटी महामंडळाच्या नव्या अध्यक्षांवर थेट निशाणा

‘शिवनेरी सुंदरी’वरून रोहित पवार भडकले; एसटी महामंडळाच्या नव्या अध्यक्षांवर थेट निशाणा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Oct 02, 2024 | 5:17 PM
Share

'सरकारच्या तर्कहीन आणि लहरी धोरणांमुळेच महाराष्ट्राची वाट लागत आहे म्हणूनच महाराष्ट्र परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे आणि ते होणारच', असे म्हणत एसटी महामंडळाच्या शिवनेरी सुंदरी या निर्णयावर रोहित पवार यांनी टीका केली आहे.

शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी विमानात जशी हवाई सुंदरी असते त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार असल्याची घोषणा केली. मात्र यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच आता शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सरकारच्या तर्कहीन लहरी धोरणांमुळेच महाराष्ट्राची वाट लागतेय’, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ‘सरकार कोणत्या विषयांना प्राथमिकता देते यावरून सरकारची वृत्ती आणि शहाणपणा दिसतो. आज राज्यात गळणारी एसटी, पत्रे उडणारी एसटी, खिडक्या तुटलेली एसटी अशा दुरवस्थेत असलेल्या एसटीची स्थिती सुधारण्यावर भर देण्याची गरज असताना तसेच एसटी कर्मचाऱ्यांना, एसटी प्रवाश्यांना पायाभूत सुविधा देऊन त्यांचे आयुष्य सुंदर करण्याची गरज असताना एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष मात्र शिवनेरी सुंदरी सारख्या योजना आणत आहेत’, असे रोहित पवार म्हणाले.

Published on: Oct 02, 2024 05:17 PM
Follow Us