Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
बुलढाणा पोलिसांत शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गायकवाड अडचणीत आले आहेत. एका ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार गायकवाड अडचणीत आले आहेत. एका ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री हा गुन्हा दाखल झाला आहे.
गायकवाडांनी श्वेता महालेंच्या “बाप तो बाप रहेगा” या वक्तव्याला उत्तर देताना, “एखाद्या बाईने म्हटलं मी बाप आहे, तर बापासारखं शरीर कुठून आणणार आहे?” असे आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने तक्रार दिली. यापूर्वीही आमदार निवासामधील कर्मचाऱ्याला मारहाण करणे आणि शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गायकवाड वादात सापडले होते. मात्र, सत्ताधारी आमदार असल्याने तेव्हा कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांच्या पत्नीवर केलेल्या वक्तव्यामुळे गायकवाड कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत.
