MNS : हिंदी सक्तीचा GR रद्द, 5 जुलैचा मोर्चा नाही पण… मनसेच्या अविनाश जाधवांची एकच इच्छा, म्हणाले, आपण…
५ जुलैच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे हिंदीचा GR रद्द आता विजयी सभेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हिंदी धोरणाचा जीआर रद्द झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंची एकत्र विजयी सभा होणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे. तर हिंदी सक्ती धोरणाचा जीआर रद्द होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषा सक्ती विरोधात एकत्रित रस्त्यावर उतरणार होते. मात्र आता सरकारने एक पाऊल मागे घेत हा जीआर रद्द केल्यानंतर आता ५ तारखेच्या मोर्चाऐवजी विजयी सभा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दुसरीकडे मनसेची आज सकाळी दहा वाजता यासंदर्भात एक बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरे आता नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून आहे. तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ५ जुलैला मोर्चा नाही पण विजयी रॅली निघावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

