‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’, भाजपच्या माजी मंत्र्यांची जिव्हारी लागणारी टीका, मनसेकडूनही जोरदार पलटवार
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली तर भाजपचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी देखील जिव्हारी लागणारी टीका केली.
‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’, असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी करत मनसे अध्यक्ष राज ठकारे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. तर राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसेकडूनही जोरदार पलटवार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची कृपाशंकर सिंग यांची लायकी नाही, असं प्रत्युत्तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलं आहे. ‘राज ठाकरे काहीही बोलले तर ते समजायला वेळ लागतो. राज ठाकरेंना कधी कळत नाही ते आज काय बोलले उद्या काय बोलतील? राज ठाकरे सकाळी उठून भांग पितात आणि मस्त राहतात आणि संध्याकाळी भाषणं करतात.’, असं जहरी टीका कृपाशंकर सिंग यांनी राज ठाकरेंवर बोलताना केली. तर ‘राज्यात सगळीकडे धुळवडीचा उत्साह आहे. सगळे मज्जा करताय. कशाला उगीच गलिच्छ राजकारण करायचं?’, असा सवाल करत अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांची लायकीच काढली. जो कोणी राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका करतील त्यांच्या कानाखाली आवाज निघेल, महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.