सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल

काही काळ सोडला तर इतर वेळेस फडणवीसांकडे सत्ता होती. तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय. पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद का देतील? अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.

नाशिक दत्तक घेतल्यावर 2 वर्षच सत्तेची मिळाली. त्यामुळे नाशिकसाठी फारसं काही करता आलं नाही, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी फडणवीस यांना जोरदार उत्तर दिलं आहे. काही काळ सोडला तर इतर वेळेस फडणवीसांकडे सत्ता होती. तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय. पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद का देतील? अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.