2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
दोन पक्ष नाही, तर दोन परिवार या निवडणुकीत एकत्र आलेत. त्यामुळे 16 तारखेला चांगला रिझल्ट बघायला मिळेल, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मनसे नेते अमित ठाकरेंनी रोडशोवर अधिक भर दिला. दक्षिण मुंबईत त्यांनी सर्वाधिक रोड शो केले. शिवडी येथील रोड शोला तर तुफान गर्दी होती. यावेळी त्यांनी जनतेशी संवादही साधला. मीडियाशीही संवाद साधला. सुरवातीपासून प्रचार करत असताना जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय, असं अमित ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी युतीवरही भाष्य केलं. दोन पक्ष नाही, तर दोन परिवार या निवडणुकीत एकत्र आलेत. त्यामुळे 16 तारखेला चांगला रिझल्ट बघायला मिळेल, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थावर ‘लाव रे तो व्हिडिओ म्हणत’ उत्तर दिलं होतं. त्यावर विरोधक पण म्हणाले, ‘आम्ही पण तो व्हिडीओ लावू शकतो’ त्यावर अमित ठाकरे उतरले. सत्ता आमच्या हातात येणार आहे. त्यामुळे 5 वर्ष व्हिडिओ करत बसा, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

