कोयनेला न पोहोचणारे मुख्यमंत्री दिल्लीत काय पोहोचणार? मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका

सध्या संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे, संदीप देशपांडेंनी नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी खिल्ली उडवली. जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरात लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माघारी फिरावं लागलं होतं. त्यावरुन संदीप देशपांडेंनी निशाणा साधला.

सध्या संदीप देशपांडे हे अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे, संदीप देशपांडेंनी नाशिकमध्ये मनसेने उभारलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published On - 5:45 pm, Thu, 29 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI