परप्रांतीयाकडून थेट राज ठाकरेंना शिवीगाळ! मनसे आक्रमक
अंधेरी पूर्वेतील सुंदरनगरमध्ये राज ठाकरे यांना सुजित दुबे नावाच्या तरुणाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. दारूच्या नशेत केलेला हा अपमान सोशल मीडियावर व्हायरल झाला. मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अंधेरी परिसरात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. व्हिडीओत सुजित दुबे दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवाय, सुजित दुबे याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या तीन अनधिकृत धंद्यांवर तातडीने बंदी घालण्याची मागणीही मनसेने केली आहे. जर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई झाली नाही, तर पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

