Raj Thackeray : ‘मतचोरी’बद्दल राहुल गांधींसोबत मनसे? काही तरी गडबड, सत्ताधाऱ्यांना खेळ उघडा पडण्याची भिती, राज ठाकरे काय म्हणाले?
राहुल गांधी यांच्यानंतर राज ठाकरेंनीही मतचोरीचा आरोप केला आहे. 2014 सालापासून देशात मतांची चोरी होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा मतचोरीचा आरोप केला आहे. मत चोरले जात आहेत. मतांमध्ये गडबड आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. 2014 पासून मतांची चोरी करूनच सत्ता राबवली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. गेल्या दहा-बारा वर्षातला हा खेळ उघडा पडेल आणि म्हणून प्रकरण दाबलं जातंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय. राज ठाकरे यांनी याआधी ईव्हीएम विरोधामध्ये भूमिका घेतली होती. सोनीया गांधी, ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा आपण केलं होतं. असं राज ठाकरे यांनी म्हटलय. दरम्यान, राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर देशभरात वातावरण तापले आहे. बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलाय. आता राज ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधार्यांवर वोट चोरीचा आरोप केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

