Raj Thackeray : ‘त्या’ चार आमदारांना धडकी! राज ठाकरेंचं भरसभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’, मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स…
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, असे आव्हानही त्यांनी दिले. सत्ताधारी आमदारांनीही यादीत घोळ असल्याचा दावा केला असून, याविरोधात 1 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल 96 लाख बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह प्रत्येक शहर आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोटे मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत ही यादी स्वच्छ करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असे थेट आव्हान राज ठाकरे यांनी दिले. त्यांनी सत्ताधारी पक्षांवर मॅच फिक्सिंगचा आरोप करत, विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यास भाजप नेते का उत्तर देतात, असा सवालही उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी आपल्या सभेत पैठणचे आमदार विलास भोमरे यांचा व्हिडिओ दाखवला. विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदार बाहेरून आणल्याचे भोमरेंनी म्हटले होते. तसेच, सतीश चव्हाण (अजित पवार गट), संजय गायकवाड (एकनाथ शिंदे गट) आणि मंदा म्हात्रे (भाजप) या सत्ताधारी आमदारांनीही मतदार यादीतील घोळाची कबुली दिल्याचे व्हिडिओ त्यांनी सादर केले. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेतेही सहभागी होणार आहेत.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

