Raj Thackeray & CM Meet : राज-फडणवीसांची अर्धा तास बैठक, ‘वर्षा’वर नेमकी काय खलबतं? भेटीचं कारण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे आणि फडणवीसांची चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बघा काय झाली खलबतं?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला या ठिकाणी या दोघांमध्ये भेट झाली. राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षानिवासस्थानी साधारण अर्धातास बैठक सुरू होती. मात्र बंददाराआड झालेल्या खलबतांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान याआधी देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना विजयी मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जात राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या होत्या. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दोन्ही ठाकरेंकडून याआधी संकेत देण्यात आले होते. अशातच आता राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. ‘वर्षा’वर नेमकी काय खलबतं? भेटीचं कारण काय? बघा व्हिडीओ
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

