Raj Thackeray : राज ठाकरेंची मोठी घोषणा, 5 जुलैला विजयी मेळावा होणार पण…
'सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. तुम्हीही लावू नका. वर्तमानपत्र आणि चॅनलने हा विषय लावून धरला', राज ठाकरे यांनी मेळाव्यासंदर्भात नेमकं काय सांगितलं?
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्री धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा समावेश करण्यात आला होता. मात्र या धोरणाला महाराष्ट्रातून विरोध पाहायला मिळाला. विशेषतः मनसे आणि उद्धव ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर अखेर सरकारला हा जीआर रद्द करावा लागला. यासंदर्भात राज ठाकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि महाराष्ट्राचं, मराठी जनतेसह साहित्यिक, मोजके कलावंत त्याच बरोबर मराठी वर्तामानपत्राचे, मराठी चॅनल्सचे देखील त्यांनी आभार मानले.
दरम्यान, 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द झाल्यानंतर त्याऐवजी विजयी सभा होणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. ५ जुलैला विजयी मेळावा होणार पण तो कोणताही पक्षाचा नसेल. या मेळाव्यात पक्षीय लेबल नसेल. मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, केवळ मराठी हा अजेंडा असणार आहे. हा मेळावा केवळ विजयी मिळावा असणार आहे. उद्या मेळावा वैगरे काय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कळवेन. पण विजयी मेळाव्यात कोणताही अजेंडा नसेल, असेही राज ठाकरेंनी सांगितले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

