Raj Thackeray : गाफील राहू नका, तर… राहुल गांधींनंतर राज ठाकरेंचा व्होट चोरीचा आरोप, पदाधिकाऱ्यांना सूचना काय?
राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे मतदार यादीत गडबड असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांना अनुसरून राज ठाकरे यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादींचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे एका सभेत पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप केला आहे. हा आरोप राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांना दुजोरा देत असल्याचे पाहायला मिळतंय. राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत सतर्क राहण्याचे आणि मतदार याद्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक मतदार यादीवर दोन बीएलओ नेमण्याचे आणि गट अध्यक्षांना याची जबाबदारी सोपवण्याचे सुचवले. कार्यकर्त्यांना मतदार यादींबद्दल प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. महाराष्ट्रातील नवीन मतदार यादीमध्ये 14 लाख 71 हजार नवे मतदार समाविष्ट झाले असून 4 लाख 9 हजार मतदार वगळण्यात आले आहेत. ठाणे, मुंबई आणि पुणे जिल्ह्यात नवीन मतदारांची सर्वाधिक वाढ झाली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

