Raj Thackeray : राज ठाकरे आज पुण्यात; ‘या’ विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार
Raj Thackeray Pune Daura : राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. शिवाय राज ठाकरे पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याची माहिती आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. पुण्यातील गुजरवाडी इथे उभारण्यात आलेल्या डॉग पॉंडचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात डॉग पॉंड उभारण्यात आलं आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्याची शक्यता आहे. मनसेने पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

