AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : साधूंच्या नवानं संधीसाधूपणा... उद्योगपतींचे दलाल... संघर्षाची भूमिका घेतल्यास जनतेसोबत मनसे... सरकारला राज ठाकरेंनी घेरलं

Raj Thackeray : साधूंच्या नवानं संधीसाधूपणा… उद्योगपतींचे दलाल… संघर्षाची भूमिका घेतल्यास जनतेसोबत मनसे… सरकारला राज ठाकरेंनी घेरलं

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 29, 2025 | 1:00 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. या संघर्षात मनसे जनतेसोबत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, “सरकारनं साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये.” कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर सरकारकडे दुसरीकडे पाचपट झाडे लावायला जागा असेल, तर तिकडेच साधुग्राम उभारावे असे आवाहनही त्यांनी केले.

राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर “उद्योगपतींचे दलाल” म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. भविष्यातील निवडणुकांनंतरही वृक्षतोडीला आपला विरोध कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने उगाच संघर्ष वाढवू नये, जनतेच्या भावनांचा आदर करावा, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेच्या बरोबर या लढ्यात असेल, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Published on: Nov 29, 2025 01:00 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा