Sharmila Thackeray Taunts BJP : मूक आंदोलन मग बडबड का? भाजपच्या त्या टीकेवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल, लगावला टोला
मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा काढला, तर भाजपने मूक आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. यावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी "मूक आंदोलन मग बडबड कशाला?" असा सवाल विचारत भाजपला टोला लगावला. भाजपने विरोधकांच्या मोर्चाला "फॅशन शो" संबोधले, तर अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केली.
मतदार याद्यांमधील अनियमिततेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाच्या विरोधात “सत्याचा मोर्चा” काढत मतदार याद्या शुद्ध करण्याची मागणी केली. या मोर्चाला भाजपने गिरगाव चौपाटीवर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शनं करत प्रत्युत्तर दिले.
भाजपने विरोधकांच्या या मोर्चाला “फॅशन शो” असे संबोधत जोरदार टीका केली. या टीकेवर आणि भाजपच्या मूक आंदोलनावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पलटवार केला. “मूक आंदोलन आहे, मग बडबड कशाला?” असा सवाल करत त्यांनी भाजपच्या दुहेरी भूमिकेवर निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक नेते या मूक आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपने महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हटले असून, राज ठाकरे केवळ प्रमोशनसाठी व्यासपीठावर दिसत असल्याचे आरोप केले आहेत.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

