Mumbai News : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं पुन्हा एकत्र आंदोलन; कर्नाक पुलाचा मुद्दा तापला
Shivsena UBT - MNS Protest : कर्नाक पूल सुरू झालेला नसल्याने आज मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आंदोलन केलं आहे.
कर्नाक पुल अद्याप सुरू झालेला नसल्याने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक झालेली आहे. कर्नाक पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांचं एकत्रित आंदोलन आता सुरू झालं आहे. याआधी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले मनसे आणि ठाकरे गट आता कर्नाक पुलाच्या मुद्द्यावर देखील एकत्र आंदोलन करताना बघायला मिळत आहेत.
कर्नाक पूलाचं काम अजूनही सुरू झालेलं नसल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलं आहे. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेद्वारे केला आहे. मात्र अद्याप हा पूल सुरू झालेला नाही. १० जूनपर्यंत हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन होते, मात्र आता जुलै महिना सुरू झाला तरी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही, त्यामुळे आज ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.